शेवटच्या टप्प्यात प्रचाराच्या तोफांना आज पूर्णविराम

    दिनांक  17-May-2019नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने प्रचारावर एक दिवस आधी म्हणजेच १६ मे रोजी बंदी घातली. त्यामुळे पश्चिम बंगाल सोडून ८ राज्यांमध्ये १७ मे रोजी संध्याकाळपर्यंतच प्रचार सुरू राहील. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील ९ जागांवर मतदान होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शत्रुघ्न सिन्हा, शिबू सोरेन, ज्योतिरादित्य शिंदे आदींचे भवितव्य रविवारी 'ईव्हीएम'मध्ये बंद होईल. सातव्या टप्प्यातील मतदानासाठी विविध राज्यांत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

बंगालमधील कोलकाता दक्षिण आणि कोलकाता उत्तर, डमडम, बारासात, बशिरहाट, जयनगर, मथुरापूर, डायमंड हार्बर, जाधवपूर या ९ ठिकाणी येत्या १९ मे रोजी मतदान होणार आहे. नियमानुसार ४८ तास आधी म्हणजे १७ मे रोजी हा प्रचार सायंकाळी बंद होणार होता. मात्र, येथील प्रचार १६ मेच्या रात्री १० वाजल्यापासूनच बंद करण्याचा आदेश आयोगाने दिला. या निर्णयामुळे विरोधी पक्षांनी आयोगावर टीका केली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat