भारत चित्रपटातील 'जिंदा' हे नवीन गाणे प्रदर्शित

    दिनांक  17-May-2019

 

अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' हा चित्रपट ५ जूनला भारतभर प्रदर्शित होणार आहे. त्या आधी आज 'भारत' मधील 'जिंदा' नावाचे गाणे प्रदर्शित झाले आहे. सामान्य माणसाची असामान्य कथा या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे याची झलक आपण या गाण्यामध्ये पाहू शकतो. 'जिंदा' हे गाणे खरेच सलमान खानच्या जगण्या-मारण्याच्या प्रश्नांवर भाष्य करणारे आहे असे गाणे पाहिल्यावर जाणवते.

 
 
या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे खुद्द दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी या गाण्यातून संगीत दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. हे गाणे विशाल दादलानी यांनी आपल्या आयकॉनिक शैलीत गेले आहे. गाण्याचे शब्द देखील अली अब्बास जफर यांनीच लिहिले आहेत. त्यामुळे आता हा चित्रपट त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक गोष्ट ठरला आहे. या गाण्याला प्रचंड मिळत असून अत्तापर्यंत ४ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. सलमान खानच्या चित्रपटामधील आयुष्यातील उतार-चढावावर चित्रित 'जिंदा' हे गाणे ऐकल्यावर प्रेक्षकांमध्ये देखील उत्साह निर्माण होईल यात शंका नाही. 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat