कान चित्रपट महोत्सवात प्रियांकाची स्टनिंग एंट्री

17 May 2019 11:40:25


७२ व्या कान चित्रपट महोत्सवात आत्तापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याने आणि नवीन नवीन ट्रेंडी लुक्ससह एंट्री केली. फ्रान्समधील फ्रेंच रिवेरा येथे १४ मे पासून २५ मे पर्यंत कान चित्रपट महोत्सव पार पडत आहे.

यामध्ये काल प्रियांका चोप्राने या वर्षी पहिल्यांदाच कानच्या रेड कार्पेटवर पदार्पण केले आणि आपल्या पहिल्याच लूकने सर्वांना मोहिनी घातली. तिचा रेड आणि ब्लॅक रंगाचा शिमरी गाऊन त्या रात्रीला आणखीनच चकाकी देत होता. प्रियांका बरोबरच कंगना आणि दीपिका यांनी देखील आपली उपस्थिति दर्शवत आपल्या वेगळ्याच अंदाजाने उपस्थितांना आकर्षित केले. दीपिकाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि त्यावर ब्लॅक स्टेटमेंट बो अशा तिच्या लूकची सर्वांनी प्रशंसा केली. त्याचरोबर कंगना राणावतचा कान मधील भारताची संस्कृती जपत साडीतील थोडासा हटके लूक देखील अप्रतिम ठरला.

या सगळ्या पोशाखांबरोबरच या वर्षीचा कान चित्रपट महोत्सव भारतासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. याचे कारण म्हणजे यावर्षीच्या कान चित्रपट महात्सवात भारताचा पॅव्हेलियन ठेवण्यात आला असून या माध्यमातून भारतीय कलाकारांना देशाबाहेरील कलाकारांशी संवाद साधता यावा हा यामागील हेतू आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0