जेएनयुमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या

    दिनांक  17-May-2019
 


नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात इंग्रजी विभागात पदव्युत्तर शिक्षण घेत असणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विद्यार्थ्याने स्वतःला पंख्याला लटकवून गळफास घेतल्याने खळबळ उडाली आहे.

 

ऋषी थॉमस, असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे, तो एमए इंग्रजीच्या दुसऱ्या वर्षात होता. संबंधित विद्यार्थ्याने आत्महत्येपूर्वी प्राध्यापकांना ई-मेल करून सुसाईड नोट पाठवल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, त्यात काय उल्लेख केला आहे. त्याबद्दल माहीती मिळू शकलेली नाही.

 

विद्यापीठात उपस्थित वॉर्डन आणि इतर अधिकाऱ्यांची चौकशी केल्यानंतर, ग्रंथालयाची खोली आतमधून बंद असल्याचे समजले. दरवाजा वाजवल्यावर कोणताही प्रतिसाद न आल्याने खिडकी उघडून पाहिल्यावर ऋषीने स्वत:ला पंख्याला लटकवून गळफास घेतल्याचे दिसले.

 

उपस्थितांनी दरवाजा तोडून शव बाहेर काढले, असे वॉर्डनने सांगितले. डॉक्टरांनी वैद्यकीय चाचणीनंतर विद्यार्थ्यांचा मृत घोषित केले आहे. आत्महत्येमागील कारण अजूनही स्पष्ट झाले नसून, पुढील चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat