शारदा घोटाळा : राजीव कुमार यांच्या अटकेवरील स्थगिती उठवली

    दिनांक  17-May-2019


 


नवी दिल्ली : शारदा चिट फंड गैरव्यवहाराच्या प्रकरणात कोलकात्याचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळू शकलेला नाही. राजीव कुमारला अटकेपासून दिलेले संरक्षण काढून घेतले असून न्यायालयाने कुमार यांच्या अटकेवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने हटवली आहे.

 

शुक्रवारी या प्रकरणी सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की सीबीआय आपले काम करू शकते. मात्र, न्यायालयाचा हा निर्णय सात दिवसांनंतर लागू होणार आहे. या दरम्यान राजीव कुमार यांना कायदेशीर पावले उचलू शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे प. बंगालच्या ममता बॅनर्जी यांना दणका बसला आहे.

 

कोलकत्त्याचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्यावर अटकेची टांगती तलवार यामुळे कायम आहे. सीबीआय त्यांना सात दिवसांनंतर अटक करू शकते. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की या सात दिवसांच्या कालावधीत कुमार आपल्या जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल करू शकतात. जर त्यांना जामीन मिळाला नाही तर सीबीआय त्यांना अटक करू शकते. कोलकाताचे माजी आयुक्त राजीव कुमार यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या शारदा चीटफंड घोटाळ्यातील पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat