अब कि बार ३०० पार...

    दिनांक  17-May-2019



नवी दिल्ली : "मी प्रचाराची सुरुवात मेरठमध्ये केली होती आणि शेवट खरगौनमध्ये करत आहे. यावेळी संपूर्ण देश म्हणतो आहे की, पुन्हा एकदा मोदी सरकार, अबकी बार ३०० पार." असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्यप्रदेशमधील जनतेसमोर दिला. लोकसभा निवडणूक २०१९च्या शेवटच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशात लोकांना संबोधित केले.

 

पुढे पंतप्रधान मोदींनी सांगितले की, "१९ तारखेला तुम्ही मतदान कराल तेव्हा तुम्ही इतिहास रचणार आहात. तुम्ही दुसऱ्यांदा पूर्ण बहुमताचे सरकार आणणार आहात. यंदा संपूर्ण देश कोणत्या पक्षासाठी नाही तर देशासाठी मतदान करत आहे. जनता सरकार नाही तर देशाचं भविष्य बनवण्यासाठी मतदान करत आहे."

 

पंतप्रधानांचा काँग्रेस आणि राहुल गांधींवर घणाघात...

 

पंतप्रधान मोदींनी यावेळी काँग्रेसवर टीका करत सांगितले की, "काँग्रेस सैनिकांचा विशेषाधिकार काढून, देशद्रोहाचा कायदा संपवण्याची भाषा करत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये वेगळ्या पंतप्रधानांचे समर्थन करणाऱ्या लोकांना लोकांनी नाकारले आहे. या निवडणुकीत जनता त्यांना शिक्षा देईल." पुढे त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करत सांगिलते की, "मध्यप्रदेशात १५० दिवस झाले तर कर्जमाफी झाली नाही. हे लोक वीजबिले अर्धे करणार होते. पण यांनी वीजच अर्धी करुन टाकली. मध्य प्रदेशात अडीच मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांना देखील काम करता येत नाही आहे."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat