साध्वींनी माफी मागितली तरीही मनाने माफ करू शकत नाही : नरेंद्र मोदी

    दिनांक  17-May-2019


 

नवी दिल्ली : साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. मात्र, तरीही भाजपवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. "साध्वी यांचे वक्तव्य घृणास्पद आहे. त्यांनी माफी मागितली असली तरी मी त्यांना मनाने कधीच माफ करू शकणार नाही.", असे मोदींनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यापूर्वी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, " नरेंद्र मोदी यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेल्या वक्तव्याबाबत पहिल्यांदात जाहीर प्रतिक्रिया दिली आहे. "साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेले विधान घृणास्पद आहे. टीका करण्याच्या योग्यतेचे आहे. सभ्य समाजामध्ये अशा प्रकारची वक्तव्ये होता कामा नयेत. त्यांनी माफी मागितली आहे. मात्र, मी त्यांना कधीही मनाने माफ करू शकणार नाही,'', असे ते म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat