किंग खान आणि डेव्हिड लेटरमन यांची भेट

17 May 2019 12:20:07


 

भारतीय सिने सृष्टीचा बादशाह किंग खान आणि हॉलिवूडमधील दिग्गज कलाकार डेव्हिड लेटरमन यांच्या भेटीविषयी बऱ्याच चर्चा रंगात असताना नेटफ्लिक्स इंडियाने अखेर त्यांच्या पहिल्या भेटीची क्षणचित्रे सोशल मीडियावर शेअर केली. या भेटीमध्ये त्या दोघात नेमका काय संवाद झाला हे अजून गुलदस्त्यात असले तरी नेटफ्लिक्सच्या नव्या सिरीजमध्ये किंग खानचा असलेला सहभाग पक्का असल्याची शंका आता या भेटीमुळे खरी ठरणार अशी चिन्हे दिसत आहेत.

 

या भेटीदरम्यान शाहरुख खानाने न्यूयॉर्क मधील त्याच्या छोट्या फॅन्स बरोबर फोटो देखील काढले. आता या भेटीमुळे शाहरुख खानच्या चाहत्यांची उत्सुकता अधिकच वृध्दीनगात झाली आहे. या भेटीनंतर शाहरुख खानाने आपल्या सोशल मीडियावरून अतिशय भावुक शब्दात या भेटीचा अनुभव व्यक्त केला आहे.




माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0