दादाचा 'असाही' आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत समावेश...

    दिनांक  17-May-2019नवी दिल्ली : जगाचे लक्ष लागलेल्या आयसीसी विश्वकरंडक २०१९ स्पर्धेसाठी अवघे काहीच दिवस उरले आहेत. अशातच आयसीसीने समालोचकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत तीन भारतीयांना संधी देण्यात आली आहे. सौरव गांगुली, संजय मांजरेकर आणि हर्षा भोगले यांना कॉमेंट्री पॅनलमध्ये जागा देण्यात आली आहे.

 

ऑस्ट्रेलियास मागचा विश्वकरंडक जिंकून देणाऱ्या मायकल क्लार्क हादेखील समालोचकाच्या भूमिकेत दिसेल. याचसोबत माजी सलामीचा फलंदाज मायकल स्लेटर, मार्क निकोलस, नासिर हुसेन, इयान विशप, मेलेनी जोंस, कुमार संगकारा, माइकल अॅथरटन, अलिसन मिशेल, ब्रँडन मॅक्युलम, ग्रीम स्मिथ, वसीम अकरम सारखे दिग्गज खेळाडू विश्वकरंडकात समालोचन करताना दिसून येतील.

 

याचसोबत शॉन पोलॉक, मायकल होल्डिंग, ईशा गुहा, पोमी मांग्वा, सायमन डाउल, ईयान स्मिथ, रमीज राजा, अथर अली खान आणि इयान वार्ड यांनादेखील संधी मिळाली आहे. इंग्लंडमध्ये ३० मे ते १५ जुलैदरम्यान विश्वकरंडक स्पर्धा खेळविली जाईल. भारताचा पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

 

अशी आहे समालोचकांची यादी

 

 
 

शॉन पोलॉक, मायकल स्लेटर, मार्क निकोलस, मायकल होल्डींग, इशा गुहा, पॉमी एमबान्ग्वा, संजय मांजरेकर, हर्षा भोगले, सायमन डुल, इयन स्मिथ, नासिर हुसेन, इयन बिशॉप, सौरभ गांगुली, मेलेनी जोन्स, कुमार संगकारा, मायकल अथर्टन, अ‍ॅलिसन मिचेल, ब्रेंडन मॅकलम, ग्रॅम स्मिथ, वासिम अक्रम, रमीझ राजा, अथर अली खान आणि इयान वार्ड

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat