पुन्हा भाजपलाच पूर्ण बहुमत मिळेल : नरेंद्र मोदी

    दिनांक  17-May-2019
नवी दिल्ली : "भारत हा जगभरातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेला आहे. देशात विविधेतली एकता आहे आणि ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या एकत्र होतात. रमजान, ईस्टर, विद्यार्थ्यांच्या परीक्षा, हनुमान जयंती सगळे एकत्ररित्या सुरू असून यात आत्ता निवडणुकीचा प्रचारही संपला आहे.", प्रचारातील अनुभव चांगला असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

 

भारतात लोकसभेत संपूर्ण बहुमत मिळून सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केले आहे, ही गोष्ट अनेक वर्षांनी घडली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आता पुन्हा एकदा पूर्ण बहुमत असलेले सरकार येईल, असाही विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. या पत्रकार परिषदेत मोदींनी कॉंग्रेसला टोला लगावला. "आधी काहींना देशाचे नेतृत्त्व एक-दोन वर्षांसाठी सत्ता मिळाली किंवा एका परिवाराला सत्ता मिळाली. मात्र, जनतेने बहुमताने निवडलेले सरकार पाच वर्षे चालले ही बाब अनेक वर्षांनी घडली आहे, असे मोदी म्हणाले.

 

मोदींनी मानले देशवासीयांचे आभार

पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी आज पहिली पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत त्यांनी सगळ्या देशाचे आणि मतदारांचे आभार मानले. माझ्यासाठी निवडणूक प्रचार हा जनतेला धन्यवाद देण्यासाठी होता, हेच मी मानतो असेही मोदी म्हणाले. आम्हाला आता जनतेचा आशीर्वाद हवा आहे, असेही मोदी म्हणाले. "आम्ही देशातल्या प्रत्येक माणसापर्यंत आमच्या योजना पोहचवल्या याचा आम्हाला गौरव वाटतो, देशाच्या जनतेचा कौल काय येईल ते २३ तारखेला स्पष्ट होणार आहे. देशाच्या विकासाचे निर्णय आम्ही घेतो आहोत. यापुढेही घेऊ.", असेही मोदी म्हणाले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat