राहुल गांधी मतिमंद : अनंतकुमार हेगडेंचा पुन्हा हल्ला

    दिनांक  17-May-2019


 

कारवार : नथुराम गोडसेबद्दलच्या विधानाबद्दल केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांचे समर्थन केल्यानंतर आता त्यांनी थेट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनाच लक्ष्य केल आहे. हेगडे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना मतिमंद म्हटले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी असे संबोधले आहे.

 
 
 
 

राहुल गांधी यांनी इंग्रजी डिक्शनरीमध्ये 'मोदीलाय' नावाचा नवा शब्द समाविष्ट झाला असल्याचे ट्वीट केले होते. त्या ट्विटखाली त्यांनी मोदीलाय या शब्दाचा अर्थही सांगितला होता. राहुल यांच्या त्या ट्वीटला उत्तर देताना हेगडे म्हणाले की, मतिमंद राहुल गांधी हे स्वतःला आंतरराष्ट्रीय मूर्खपणाचे कौशल्य असल्याचे सिध्द करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असे विधान हेगडे यांनी ट्विटच्या माध्यमातून केले. याआधीसुद्धा राहुल गांधींना तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मतिमंद म्हटले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat