पुन्हा एकदा ट्विटरवर #BoycottAmazoneचा ट्रेंड

    दिनांक  16-May-2019


 


नवी दिल्ली : ऑनलाईन खरेदीसाठी प्रसिद्ध असलेली अॅमेझॉन ही वेबसाईट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. भारतीय ट्विटर वापरणाऱ्या यूझर्सनी पुन्हा एकदा #BoycottAmazonचा ट्रेंड वापरात आणला आहे. हिंदू धर्मातील देवांचे फोटो हिंदू भावनांचा अनादर करणाऱ्या वस्तूंवर वापरले आहेत. याप्रकारचे फोटो सोशल वेबसाईटवर आल्यानंतर सगळीकडून या गोष्टीचा निषेध केला आहे. 

 

अवघ्या तासाभरातच #BoycottAmazonचा ट्रेंड ट्विटरवर दुसऱ्या क्रमांकावर आला. ५,७०० ट्विटरकरांनी ट्विट करून आपला निषेध नोंदवला. हा सर्व प्रकार अंशुल सक्सेना या ट्विटर वापरकर्त्याने समोर आणला. त्याने ट्विट केलेल्या फोटोसमध्ये भारतीय देवीदेवतांची पायपुसणी, चप्पल, बूट तसेच टॉयलेट कमोडच्या कव्हरवर दाखवण्यात आले आहेत. "वारंवार अशा चुका करून अॅमेझॉन कंपनी फक्त हिंदूंच्याच नाही तर करोडो भारतीयांची मने दुखावत आहेत." अशा भावना अंशुल सक्सेना याने व्यक्त केल्या आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat