सरसंघचालकांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

    दिनांक  16-May-2019


चंद्रपूर : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या ताफ्यातील वाहनाला गुरूवारी अपघात झाला. गुरूवारी संध्याकाळी नागपूरला परतत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-भद्रावती दरम्यान हा अपघात झाला. मात्र, अपघातात सरसंघचालकांच्या वाहनाला कोणतीही इजा झालेली नाही, तसेच सरसंघचालक सुखरुप आहेत. आजच्या अपघातात डॉ. मोहनजी भागवत यांचे चार सुरक्षा रक्षक मात्र जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat