किशोर कुमारांच्या गाण्याचा एक नवीन अंदाज

16 May 2019 17:44:18

 


किशोर कुमार हे भारतीय संगीतसृष्टीला लाभलेले एक रत्न आहे. त्यांची गाणी ही अजरामर आहेत. त्यांच्याच
'बाबू समझो इशारे' हे गाणे एका नवीन अंदाजात प्रदर्शित झाले आहे. डीजे स्नेकने या गाण्याला एक वेगळाच ढंग दिला आहे. या नवीन गाण्याच्या शैलीला संगीताच्या भाषेत इडीएम असे म्हटले जाते. इडीएम म्हणजेच इलेक्रॉनिक डान्स म्युसिक जे आजकाल बॉलिवूडमधील गाण्यांमध्ये देखील सर्हास पाहायला मिळते.
  




 

डीजे स्नेक हा फ्रान्समधील एक प्रसिद्ध डीजे आहे. आणि त्याचे बॉलिवूडमधील जुनी गाणी आणि संगीतावर प्रचंड प्रेम आहे. मागील वर्षी 'लिन ऑन' नावाचे एक गाणे त्याने भारतातच शूट केले होते ज्याला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. त्यामुळे त्याचे बॉलिवूडसाठीचे प्रेम तो कायमच व्यक्त करत असतो. या आधी देखील त्याने बॉलिवूडमधील काही गाण्यांना अशाचप्रकारे ट्विस्ट दिला आहे. 'देने वाला जब भी देता' हे गाणे देखील त्याने या आधी आपल्या शैलीत सादर केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0