ट्विटरवरील एक्झिट पोल त्वरित हटवा ; निवडणूक आयोगाचे आदेश

    दिनांक  16-May-2019नवी दिल्ली : लोकसभेच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यामध्ये फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत. अशामध्ये ट्विटरवरील सर्व एक्झिट पोल हटवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने ट्विटरला दिले आहेत. यावेळेसही निवडणूक आयोग सर्व एग्झिट पोलवर नजर ठेवून असणार आहे. निवडणूक अंदाज जारी करणाऱ्या मीडिया संस्थांना या संदर्भात नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र, १९ मे रोजी सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यास निवडणूक आयोगाने माध्यमांना परवानगी दिली आहे.

 

सोशल मीडियातून निवडणूक अंदाज प्रसिद्ध करण्यावर निवडणूक आयोग लक्ष असणार आहे. निर्वाचन आयोगाने मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरलाही एक्झिट पोल हटवण्याचे आदेश दिले. निवडणूक आयोगाकडे तक्रार आल्यानंतर याप्रकारचे आदेश ट्विटरला देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित यूजरने नंतर हे ट्विट हटवल्याचेही समोर आले आहे. निवडणूक आयोगाकडून असे कोणते आदेश देण्यात आले नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याच्या एक दिवस आधीच निवडणूक आयोगाने निकालांचे अंदाज दाखवणाऱ्या ३ माध्यम संस्थांना कारणे दाखवा नोटीस जारी केले होते.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat