साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या डॉक्टरला अटक

    दिनांक  16-May-2019 

मुंबई : फेसबुकवर हिंदू आणि ब्राम्हण समाजाविरोधात पोस्ट करणे एका डॉक्टराला महागात पडले आहे. भाजपकडून मध्य प्रदेशमधील भोपाळ मतदासंघातून लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याबद्दल आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकल्याप्रकरणी संबंधित डॉक्टरला विक्रोळीतून अटक करण्यात आली आहे.

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुनील कुमार निषाद, असे या डॉक्टराचे नाव आहे. हिंदू आणि ब्राह्मण समाजाविरोधात त्याने अनेकदा फेसबुकवर लिखाण केले आहे. दरम्यान, बुधवारी त्याने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी असलेली पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. या पोस्टसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तिवारी यांनी विक्रोळी येथील पार्कसाइट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

 

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी डॉक्टर निषाद यांना अटक केली. गेल्या दोन वर्षांपासून डॉक्टर निषाद हिंदू समाज आणि विशेष करून ब्राह्मण समाजाविरोधात अनेकदा फेसबुकवर लिहीत असतात. आम्ही एकाच भागातील रहिवासी असल्यामुळे डॉक्टर निषाद यांना याबाबत विचारले असता, मी फेसबुकवर लिखाण करीत राहणार. तुम्हाला आक्षेप असल्यास पोलीस तक्रार करा, अशा भाषेत ते उत्तर देतात, अशी प्रतिक्रिया तक्रारकर्ता तिवारी यांनी याबाबत बोलतना दिली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat