पाकिस्तानचे विमान पाडणाऱ्या 'त्या' युनिटचा गौरव

    दिनांक  16-May-2019


 

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याच्या युनिट मिग २१ बाइसन स्क्वॉड्रनला 'फाल्कन स्लेयर्स' आणि 'एम्राम डॉजर्स' या शीर्षकांसहीत पट्टा बहाल करत त्यांचा गौरव करण्यात आला. २७ फेब्रुवारी रोजी हवाई हल्ल्यादरम्यान पाकिस्तानच्या एफ - १६ या लढावू विमानाला हाणून पाडण्याच्या कामगिरीमुळे या युनिटचे कौतुक करण्यात आले आहे.

 

भारतीय वायुसेनेच्या ५१ स्क्वॉड्रनला देण्यात आलेल्या नव्या पट्ट्यांमध्ये एक मिग-२१ सोबत लाल रंगाचा एफ-१६ दर्शवण्यात आले आहे. या पट्ट्यावर वरच्या बाजुला 'फाल्कन स्लेयर्स' तर खालच्या बाजुला 'एम्राम डॉजर्स' असे लिहिले आहे. याशिवाय भारतीय वायुसेनेकडून वर्धमान यांना वीरचक्र प्रदान करण्यात येण्याची शिफारस केली जात आहे.

 

भारताकडून पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये दहशतवादी प्रशिक्षण शिबिरावर हवाई हल्ला करण्यात आला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २७ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या अनेक लढावू विमानांनी जम्मू-काश्मीरमधल्या अनेक सैन्य शिबिरांना निशाण्यावर घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारतीय जवानांनी हादेखील प्रयत्न हाणून पाडला. याच संघर्षादरम्यान विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचे एफ-१६ लढावू विमान उद्ध्वस्त करत साहस आणि चिकाटीचा परिचय करून दिला होता.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat