स्वातंत्र्य सावरकर जयंतीनिमित्त जन्मस्थान भगूर दर्शन मोहीम

14 May 2019 15:57:17



नाशिक : २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर जाणून घेता यावेत त्यांच्या कार्याची माहीती व्हावी, त्यांचे जन्मस्थान असलेल्या भगूरचीही माहिती व्हावी या हेतूने सावरकर समूहाच्या वतीने भगूर दर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त वीर सावरकर यांच्याशी निगडीत वास्तूंच्या मदतीने माहिती दिली जाणार आहे.

 

स्वा. सावरकरांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूह भगूर व स्वातंत्र्यवीर सावरकर समूह महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने तिसरी भगूर दर्शन' अभ्यास मोहिम राबविण्यात येत आहे. या उपक्रमची सुरुवात मंगळवार, दि. २८ मे रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. या निमित्ताने पार्थ बावस्कर (पुणे) यांचे स्वा. सावरकर युवकांचे तेजस्वी स्फूर्तिस्थानआणि प्रसाद मोरे (पुणे) यांचे गांधीहत्या आणि निष्कलंक सावरकरया विषयावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या मोहिमेअंतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बालपण ज्या भगूर शहरात गेले तेथील ऐतिहासिक वाडा, शाळा, महादेव मंदिर, दारणा नदीतीर, राम मंदिर, खंडेराव मंदिर या ठिकाणी भेटी देऊन सावरकर यांच्याविषयीची माहिती देण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन भगूर समूहाचे मनोज कुवर, प्रशांत लोया, प्रमोद आंबेकर, योगेश बुरके आदींनी केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0