दुष्काळग्रस्तांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार - शरद पवार

13 May 2019 16:36:59



मुंबई : राज्याचा दुष्काळी दौरा करून येत्या काही दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही त्याचा आढावा घेणार असल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न पक्षाकडून केले जातील असेही सांगितले. शरद पवार सध्या दुष्काळग्रस्त परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याच्या दुष्काळी दौऱ्यावर आहेत.

 

दुष्काळी दौरा करत असताना लोकांना भेडसावणाऱ्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर ठेवणार असल्याचे सांगत, यावेळची दुष्काळी परिस्थिती वेगळीच असल्याचे पवार म्हणाले. लोकांना पाण्याच्या प्रश्न भेडसावत आहे. सरकारकडून ९० रुपये दुष्काळी भत्ता मिळतोय, पण त्यात वाढ करण्याची नागरिकांची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. बीड जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर असताना आज पवार बोलत होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0