आयपीएल २०१९ : या खेळाडूंनी केली लाखोंची कमाई

    दिनांक  13-May-2019
हैदराबाद : शेवटच्या चेंडूपर्यत रंगलेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंग्सचा एका धावेने पराभूत करत आयपीएल विजेतेपदाचा चौकार लगावला. अखेरच्या षटकात मलिंगाने भेदक गोलंदाजी केल्याने १५० धवांचे लक्ष चेन्नईला गाठता आले नाही. मुंबईचे हे चौथे आयपीएल विजेतेपदक आहे. अंतिम सामन्यानंतर विजेत्या व उपविजेत्या संघावर व खेळाडूंवर बक्षिसंचा वर्षाव झाला. विजेत्या मुंबई इंडियन्सला २० कोटी रुपये तर उपविजेत्या चेन्नई सुपरकिंग्सला १२.५ कोटी रुपये बक्षीस रुपात देण्यात आले.

 

वैयक्तिक स्वरूपाच्या बक्षिसांमध्येही खेळाडूंवर लाखो रुपयांचे इनाम यावेळी देण्यात आले. सर्वाधिक धावा करणारा डेव्हिड वॉर्नर ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. तर चेन्नई सुपर किंग्जचा फिरकीपटू इम्रान ताहीर सर्वाधिक २६ बळी घेत पर्पल कॅपचा मानकरी ठरला. या दोघांना प्रत्येकी १० लाख रुपये इनाम देण्यात आले.

 

अन्य पुरस्कार मिळवणारे खेळाडू

 

स्टाईलिश प्लेअर ऑफ सिझन - लोकेश राहुल (किंग्स इलेव्हन पंजाब)

 

गेमचेंजर ऑफ सिझन - राहुल चहर (मुंबई इंडियन्स)

 

इमर्जिंग प्लेअर ऑफ द सिझन - शुभमन गिल (कोलकाता नाईट रायडर)

 

सुपर स्ट्राईकर व मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर - आंद्रे रसेल (कोलकाता नाईट रायडर)

 

परफेक्ट कॅच ऑफ सिझन - कायरन पोलार्ड (मुंबई इंडियन्स)

 

फेअरप्ले अवॉर्ड - सनराईजर्स हैदराबाद

 

या सर्व खेळाडूंना प्रत्येकी दहा लाख रुपये व ट्रॉफी इनाम म्हणून देण्यात आले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat