दादरच्या पोलिस वसाहतीत सिलिंडरचा स्फोट

    दिनांक  12-May-2019मुंबई : दादर पश्चिमेकडील पोलीस वसाहतीतील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर लागलेल्या आगीत एका मुलीचा मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास ही आग लागली. यानंतर अग्निशमन दलाच्या चार गाड्या, एक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर यश मिळवले. मात्र, या आगीत तीन घरांचे नुकसान झाले.

 

पोलीस वसाहतीतील क्रमांक पाचच्या इमारतीत दुपारच्या सुमारास सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागली. यात श्रावणी चव्हाण या १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना घडली त्यावेळेस श्रावणी घरी एकटी होती. तिच्या कुटुंबातले इतर सदस्य बाहेरुन कुलूप लावून लग्न सोहळ्याला गेले होते. त्या आगीत होरपळून श्रावणीचा मृत्यू झाला आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat