डब्ल्यूटीओ मंत्रिस्तरीय बैठकीचे यजमानपद भारताला

11 May 2019 14:43:31




नवी दिल्ली : विकसनशील देशांच्या डब्ल्यूटीओ मंत्रिस्तरीय बैठकीचे यजमानपद भारताने स्वीकारले आहे. येत्या १३ आणि १४ मे रोजी नवी दिल्लीत ही बैठक होणार आहे. सोळा विकसनशील राष्ट्रे, सहा कमी विकसनशील राष्ट्रे या बैठकीत सहभागी होणार असल्याची माहिती वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.

 

विकसनशील राष्ट्रे आणि कमी विकसनशील राष्ट्रांना एका मंचावर आणून जागतिक व्यापार संघटनेशी संबंधित चिंताजनक विविध सामायिक मुद्यांवर चर्चा करून त्यांचे निराकरण करणे हा या बैठकीचा उद्देश आहे. बहुपक्षीय नियमाधारित व्यापार यंत्रणेसमोर गंभीर आणि मोठी आव्हाने असताना ही बैठक होत आहे. त्यामुळे यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

 

अर्जेंटिना, बांगलादेश, बार्बाडोस, बेनिन, ब्राझील, इजिप्त, ग्वाटेमाला, इंडोनेशिया, कझाकस्तान, नायजेरिया, ओमान, सौदी अरेबिया, टर्की, युगांडा या देशांचे उपमंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि राजदूत आपापल्या देशांचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0