...तर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश मिळणार?

    दिनांक  10-May-2019


 


सोलापूर : वैद्यकीय पदव्युत्तरच्या प्रवेशासाठी मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायानालायाने नुकताच निर्णय दिला होता. यामुळे २०० विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकार पुढाकार घेणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

 

मराठा समाजाच्या वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाजूने सरकार खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही पाटील यांनी दिली. २०० पैकी १०० विद्यार्थ्यांना मेरिटनुसार ओपनमधून प्रवेश मिळू शकेल. तर उर्वरीत १०० विद्यार्थ्यांसाठी कोटा वाढवून मिळण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारला पत्र देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat