नेटकऱ्यांनी दिला गंभीरला पाठिंबा, नेमकं झालं काय?

    10-May-2019
Total Views |



नवी दिल्ली : गौतम गंभीर यांनी आपल्या विरोधात अश्लील आणि अपमानास्पद पत्रके वाटल्याचा आरोप आपच्या नेत्या आतिशी मरलेना यांनी केला आहे. आतिशी आणि गंभीर हे दोघे पूर्व दिल्लीमधून एकमेकांविरोधात उभे आहेत. गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी गंभीरवर आरोप केले. यामुळे निवडणुकांच्या दोन दिवस आधीच पूर्व दिल्ली लोकसभा मतदार संघात नाट्यमय परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

आतिशी यांच्या आरोपानंतर गंभीरने आतिशी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला. यावेळी त्याने आपल्यावरील आरोप सिद्ध करण्याचे आव्हान आपला दिले. आरोप सिद्ध झाल्यास मी निवडणुकीतून माघार घेईन असेही तो म्हणाला. तसेच त्याने केजरीवालसारखा मुख्यमंत्री असणं हे दिल्लीकरांसाठी अपमानास्पद असल्याचीही टीका देखील केली.

 

या सर्व प्रकरणाची निवडणूक आयोग व दिल्ली महिला आयोगाने दखल घेतली आहे. महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवत ११ मे रोजीपर्यंत या प्रकारांवर काय कारवाई केली याचे उत्तर मागवले आहे. दरम्यान, गंभीरवर करण्यात आलेल्या आरोपानंतर नेटकरी गंभीरच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याचे दिसत आहे. गंभीरला पाठिंबा देण्यासाठी सोशल मीडियावर #IStandWithGambhir ही मोहीम सुरु करण्यात आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat