आता मोठ्या झाडांचेही होणार पुनर्रोपण

    दिनांक  10-May-2019


 

ठाणे : मुंबई, ठाण्यामध्ये ठिकठिकाणी मेट्रो, मोनोरेल आणि रस्तेरुंदीकरण अशा अनेक विकासकामांसाठी मोठ्या संख्येने झाडे काढून ती दुसऱ्या ठिकाणी पुनर्रोपण केले जातात. मात्र, झाडे जिवंत वा योग्य प्रकारे उखडून काढण्यासाठी मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात अत्याधुनिक यंत्रणा नाही. त्यामुळे अनेकदा झाडे उखडतानाच ती निर्जीव होतात, वा त्यांचे पुनर्राेपण योग्य न झाल्याने ती जगत नाहीत. ठाण्यात मात्र यापुढे झाडांचे योग्य प्रकारे पुनर्राेपण होणार आहे.

 

ठाणे महापालिकेने ५ कोटी रुपये खर्च करत एका नवीन मशीनची खरेदी केली आहे. अमेरिकेत तयार झालेल्या या मशीनला 'ट्रक माऊंटेड ट्री ट्रान्सप्लांटर' या नावाने ओळखले जाते. हे मशीन महापालिकेच्या ताफ्यात आल्याने आता झाडांचे पुनर्रोपण योग्य प्रकारे होईल, मोठ्या संख्येने झाडे जगतील असा विश्वास ठाणे पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat