मुंबई महापालिका आयुक्तपदी प्रवीण परदेशी

10 May 2019 22:09:18


 

मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांची अखेर मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर मावळते मुख्य सचिव युपीएस मदान यांची मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार म्हणून (करार पद्धतीने) प्रथम एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने हा शासन आदेश काढला आहे.

 

२०१४ मध्ये मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपले प्रधान सचिव म्हणून प्रवीण परदेशी यांची नियुक्ती केली होती. बेधडक निर्णय घेणारे, दूरदर्शी आणि अभ्यासू प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रवीण परदेशी ओळखले जातात. लातूर भूकंपादरम्यान त्यांनी केलेल्या कामाचे राज्यातच नव्हे तर देशात भरभरून कौतुक झाले होते. परदेशी यांचा वने, पर्यावरणाचा दांडगा अभ्यास असून जंगले टिकली पाहिजेत, प्राण्यांना त्यांचे हक्काचे घर मिळाले पाहिजे, याबाबत ते कमालीचे आग्रही आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0