चेन्नई की दिल्ली? फायनलचे तिकीट कोणाला मिळणार?

    दिनांक  10-May-2019मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-२० २०१९चा दुसरा उपांत्यपूर्व सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या दोन संघामध्ये रंगणार असून दोन्हीही संघासाठी हे 'करो वा मरो'चा सामना असणार आहे. कारण आज जो जिंकेल त्याला अंतिम फेरीचे तिकीट मिळणार आहे. विशाखापट्टणम येथील व्हीडीसीए मैदानावर सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी हा सामना सुरु होईल.

 

आयपीएल टी-२० २०१९च्या अंतिम फेरीसाठी मुंबई इंडियन्स, दिल्ली, चेन्नई व हैद्राबाद सनराईझर्स हे चार संघ पात्र ठरले होते. यापैकी चेन्नईचा पराभव करून मुंबई अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. तर दिल्लीविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्याने हैद्राबादचे स्पर्धेतील अव्हान संपले होते. त्यामुळे ज्या संघाला अंतिम फेरी गाठायची असेल, त्या संघाने आजचा सामना जिंकणे अनिवार्य आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat