ग्राहकहो जागरूक राहा...बिग बाझारची पोलखोल

    दिनांक  10-May-2019

 

बिग बाझारसारख्या एका नावाजलेल्या ब्रँडमध्ये अशी अफरातफर होणे ही अतिशय धक्कादायक बाब आहे. काही दिवसांपूर्वी झोमॅटो या एका फूड डिलिव्हरी चेनचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांच्याप्रमाणेच बिग बाझार या कंपनीचा देखील एक व्हिडीओ आज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका सुजाण ग्राहकाने हिमतीने हे पाऊल उचलून हा व्हिडीओ टाकला आहे तो जरूर बघा.


 

त्यामुळे ग्राहकहो सावध राहा. आपण घेतलेल्या प्रत्येक वस्तूची किंमत आणि एक्सपायरी डेट नक्की तपासून पहा. आणि त्यामध्ये काही चुकीचे आढळल्यास ग्राहक मंचाकडे आपली तक्रार नोंदवण्यास विसरू नका. बरेच वेळा घाईघाईत आपण या गोष्टी तपासून न घेताच ती गोष्ट विकत घेतो आणि याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat