सीएसएमटी दुर्घटना : ७०९ पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल

    दिनांक  10-May-2019



मुंबई : मुंबईतील सीएसएमटी स्थानकाजवळ कोसळलेल्या हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुरुवारी ७०९ पानांचे ८३ साक्षीदार असलेले आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. १४ मार्चला हिमालय पुलाचा अपघात झाला होता. यात ७ जणांचा मृत्यू तर ३३ जण जखमी झाले होते. मुंबईतील हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा अपघात आहे.

 

आरोपपत्रात वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश असून या प्रकरणातील मुख्य आरोपी निरजकुमार देसाई यांच्याकडून घडलेल्या जाणीवपूर्वक चुका, पुलाच्या जीर्ण झालेल्या लोखंडी सळयांच्या नमुन्यांचा फॉरेन्सिक विभागाचा अहवाल, मृतांचे व जखमींच्या नातेवाईकांची जबानी यासह ८३ साक्षीदारांचे पुरावे या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहेत.

 

मुख्य आरोपी निरजकुमार देसाईच्या विरोधातील पहिली याचिका मुंबई पोलिसांनी गुरुवारी दाखल केल्यानंतर आता लवकरच या प्रकरणातील मुंबई महानगरपालिकेचे अटक करण्यात आलेल्या ३ अभियंत्यांच्याविरोधात याचिका येत्या काही दिवसात दाखल केली जाणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat