
ज्या मुली छोटे कपडे घालतात त्यांच्यावर बलात्कार व्हायला पाहिजे अशी घाणेरडी मनीषा असलेल्या या महिलेचा स्वतःच तोकडे कपडे घातलेला फोटो सध्या व्हायरल होताना दिसतोय. नक्की काय म्हणायचे आहे या महिलेला? आपल्या देशात प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे वेशभूषा करण्याचा हक्क देण्यात आला आहे.
ही महिला एका मॉलमध्ये असताना हा व्हिडीओ व्हायरल झालेला दिसत आहे. त्यावर काही मुलींनी या महिलेला सडेतोड उत्तर देखील दिले आहे. मात्र एक महिलाच मुलींविषयी इतक्या खालच्या थराला जाऊन अशी वक्तव्य कशी काय करू शकते यावर अजूनही विश्वास बसत नाही.
सोशल मीडियाचा वापर जसा चांगल्या गोष्टींसाठी केला जातो तेवढाच त्याचा दुरुपयोग देखील होताना दिसतो. हल्ली प्रत्येकालाच प्रसिद्धीच्या झोतात यायची इच्छा असते. आणि अशातच काही जण त्यांच्यातील कौशल्य आणि हुशारीने प्रसिद्ध होतात तर काही जण त्यांच्या बेताल आणि न शोभेशा वर्तनामुळे. असाच एक व्हिडीओ कालपासून व्हायरल होत आहे. एका महिलेच्या निराधार आणि असभ्य वक्तव्यामुळे त्या सध्या चर्चेत आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat