सर्वोकृष्ट विद्यापीठात पुणे विद्यापीठ 'टॉप १०'मध्ये

09 Apr 2019 16:42:43




शैक्षणिक संस्थांची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग जाहीर


नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात उच्च शैक्षणिक संस्थांची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग-२०१९ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते जाहीर झाली. यात महाराष्ट्रातील पवई येथील आयआयटी मुंबई आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह पाच संस्थांचा समावेश आहे. तर मुंबई विद्यापीठाच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे.

 

शिक्षण, शैक्षणिक साधने, संशोधन तसेच व्यावसायिक पध्दती या मापदंडांवर ही यादी जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्रातील आयआयटी मुंबईने तीन श्रेणींमध्ये आपला ठसा उमटवला. शैक्षणिक क्षेत्रातील रँकिंगमध्ये आयआयटी मुंबईने चौथा, सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी संस्थांच्या श्रेणीमध्ये तिसरा तर सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन संस्थांच्या श्रेणीत दहावा क्रमांक पटकावला. औषधीय संस्थांच्या श्रेणीमध्ये मुंबई येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेने (आयसीटी मुंबई) चौथा क्रमांक पटकाविला तर सर्वोत्कृष्ट १० विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे १० व्या क्रमांकावर आहे.

 

सर्वोत्कृष्ट दहा विद्यापीठांमध्ये महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या एकाच विद्यापीठाला स्थान मिळाले असून मुंबई विद्यापीठाला ८१ वे स्थान मिळाले आहे. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देशातील सर्वोत्कृष्ठ ८ शैक्षणिक संस्थांना विविध श्रेणींमध्ये यावेळी सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग-२०१९ मध्ये देशभरातील ४ हजार शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या होत्या.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0