इस्त्रालयमध्येही निवडणूकीसाठी 'चौकीदार मोहीम'

09 Apr 2019 18:46:26



नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकांसाठी भाजपकडून मै भी चौकीदार मोहीम सुरू करण्यात आली आहे. सोशल मीडियावर ही मोहीम हीट ठरली आहे. इथल्या निवडणुकीत सध्या 'चौकीदार' हा शब्द सुपरहिट ठरला आहे. दुसरीकडे मित्रराष्ट्र असलेल्या इस्रायलमध्येही मंगळवारी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होत आहे. तेथील निवडणुकीतही 'चौकीदार' मोहीम प्रचंड लोकप्रिय होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे इस्रायलचे विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही ते देशाचे 'चौकीदार' असल्याचे सांगत जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू हे 'मिस्टर सेक्युरिटी' असल्याचे सांगत आहेत. मोदींप्रमाणे नेतान्याहू यांच्यासाठीही निवडणूक आव्हानात्मक आहे. मात्र, पुन्हा सरकार स्थापन करू, असा विश्वास त्यांना आहे. इस्रायलमध्ये ९ एप्रिलपासून मतदानाला सुरुवात झाली आहे.

 

नेत्यानाहू हे सलग चारवेळा इस्त्रालयचे पंतप्रधान म्हणून निवडून आले आहेत. आता पाचव्यांदा विराजमान होऊ, असा निर्धार नेतान्याहू यांनी केला आहे. त्यांच्याविरोधात ब्ल्यू अँड व्हाइट आघाडीचे प्रमुख गँट्स यांनी प्रचारात सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0