दहशतवाद्यांना पैसे पुरवल्याचे आरोप : हुर्रियत कॉन्फरन्स प्रमुखांची चौकशी

08 Apr 2019 11:06:22




नवी दिल्ली : दहशतवाद्यांना पैसा पुरविल्याप्रकरणी हुर्रियत कॉन्फरन्स प्रमुख मिरवाइज उमर फारूक आज, सोमवारी राष्ट्रीय तपास संस्थेसमोर (एनआयए) चौकशीसाठी हजर होणार असून त्यासाठी ते सकाळी श्रीनगर येथून दिल्लीत दाखल झाले आहेत.

 

एनआयएतर्फे तिसरी नोटिस जारी करून ८ एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना करण्यात आली होती. यापूर्वी एनआयएने बजावलेल्या नोटिशीवर उत्तर देताना उमर फारुक यांनी दिल्लीतील सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. श्रीनगरमध्ये चौकशीची मागणी एनआयएने फेटाळून लावली होती. त्यानंतर अखेर आज ते दिल्लीत दाखल झाले आहेत.

 

दहशतवाद्यांना पैसे पुरवल्याप्रकरणी याआधी एनआयएने फुटीरवादी नेता सय्यद अली शाह गिलानी याचा जावई अल्ताफ अहमद शाह, मिरवाइज उमर फारुकचा प्रवक्ताक शाहिद उल इस्लाम, अय्याज अकबर, फुटीरवादी नेता नईम खान, बशीर भट, राजा मेहराजुद्दीन कलवल आणि झहूर अहमद वटाली यांनी अटक केली होती.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0