ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण : मिशेलने घेतले कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे नाव

05 Apr 2019 11:05:23



नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात मुख्य आरोपी ख्रिस्तियन मिशेल याने लाचखोरीचा हिशेब ठेवलेल्या 'डायरी'तील नोंदीनुसार संक्षिप्त नावांचा खुलासा केला. त्यासंबंधीची माहिती सक्तवसुली संचलनालयाने दिली आहे. न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात ही माहीती देण्यात आली आहे.

 

मिशेलने काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचे नाव सांगितले, असा दावा ईडीने या आरोपपत्रात केला. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात मुख्य आरोपी ख्रिस्तियन मिशेलने लाचखोरीचा हिशेब असलेल्या 'डायरी'त नोंद केलेल्या संक्षिप्त नावांचा खुलासा केला आहे. त्यासंबंधीची माहिती अंमलबजावणी संचलनालयाने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात देण्यात आली.

 

मिशेलने काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचे नाव सांगितले आहे, असा दावा केला जात असून आरोपपत्रात आणखी ३ नावे असल्याचेही सांगण्यात येत आहे. मिशेलच्या माहितीनुसार, 'AP' हे एका नेत्याचे नाव आहे. तर 'Fam' म्हणजे एक कुटुंब आहे, असा ईडीचा दावा आहे. पुरवणी आरोपपत्रात आणखी तीन नावांचा समावेश केला आहे. त्यात मिशेलचा बिझनेस पार्टनर डेव्हिड सिम्स आणि त्यांचा मालकी हक्क असलेल्या दोन कंपन्या आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0