राज ठाकरे अडचणीत, सीआयडी चौकशी करण्याची मागणी

30 Apr 2019 17:53:14


 


मुंबई : पुलवामा हल्ल्याप्रकरणी केलेल्या वादग्रस्त वक्त्यव्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता आहे. याबाबत पत्रकार एस बालकृष्णन यांनी याबाबत हायकोर्टात एक याचिका दाखल केली आहे. राज ठाकरे यांनी राष्ट्रीय सुरक्षेबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची सीआयडी चौकशी करा, अशी मागणी बालकृष्णन यांनी या याचिकेत केली आहे.

 

मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरे यांनी सरकारवर टीका करताना निवडणुका जिंकण्यासाठी सरकारकडून पुन्हा एकदा पुलवामासारखा हल्ला घडवून आणला जाऊ शकतो, असे वादग्रस्त विधान केले होते. यावरून बालकृष्णन यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दखल केली होती. मात्र, या तक्रारीची दखल न घेतली गेल्याने बालकृष्णन यांनी हायकोर्टाची पायरी चढली.

 

देशाच्या सुरक्षेबाबत राज यांच्याकडे इतकी गंभीर माहिती होती तर त्यांनी याबाबत रीतसर तक्रार का दाखल केली नाही, असा सवाल बालकृष्णन यांनी या याचिकेतून विचारला आहे. तसेच राज ठाकरे हे जबाबदार नेते असून राष्ट्रीय सुरक्षेबाबत बोलताना त्यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे, असेही ते म्हणाले. दरम्यान, या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळून लावली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0