छिछोरची झलक पाहिली का ?

30 Apr 2019 17:04:54



 


नितेश तिवारी दिग्दर्शित छिछोर हा चित्रपट येत्या ३० ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. श्रद्धा कपूर आणि सुशांतसिं राजपूत सह अनेक उत्तम कलाकार या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटातील बिहाइंड द सिनचा व्हिडीओ नुकताच व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्हाला चित्रपटाची एक छोटीसी झलक देखील पाहायला मिळेल.

 
 
 

या व्हिडीओमध्ये चित्रपटातील कलाकार मजा मस्ती करत आहेत. चित्रपटाची संहिता वाचत आहेत. परंतु हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमची चित्रपट बघायची उत्सुकता नक्कीच वाढेल. विशेष म्हणजे या चित्रपटात प्रतीक बब्बर पहिल्यांदाच एका खलनायकाची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे एकूणच हा चित्रपट तुम्हाला एक चांगला अनुभव देईल असा विश्वास चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी प्रेक्षकांना दिला आहे.

आता नुकत्याच आलेल्या ताशकंत फाईल्स आणि कलंक नंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो आणि प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरतो की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
 
 
Powered By Sangraha 9.0