जाणून घ्या नव्या एर्टीगाची वैशिष्ट्ये

30 Apr 2019 15:31:45


नवी दिल्ली : वाहन उत्पादन क्षेत्रात देशातील सर्वात मोठी कंपनी मारूति सुझूकीने मंगळवारी नव्या एर्टीगाचे अनावरण केले. कंपनीने या कारला दीड लीटर इंजिनला पर्याय म्हणून बाजारात आणले आहे. पूर्वीपेक्षा अद्यावत वैशिष्ट्यांसह ही विक्रीसाठी उपलब्ध आहे. दिल्लीत या कारची किंमत ९.८६ लाखांपासून ११.२० लाख इतकी आहे.

 

२४.५० किमी प्रतिलिटर मायलेज

मारूति सुझूकीच्या एर्टीगाच्या सध्याचे मॉडेल फियाटच्या १.३० लीटर इंजिनासह उपलब्ध आहे. तर नव्या मॉडेलमध्ये डीटीएसआय २२५ इंजिन ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, प्रतिलिटर २४.५० किमी मायलेज मिळू शकणार आहे. गतवर्षीच्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर २०१८ ते एप्रिल २०१९ पर्यंत एकूण ४० हजार कारची विक्री झाली आहे.

 

 
 

 

 

२०२० एप्रिलपासून विक्री होणार बंद

मारूति सुझूकीने १ एप्रिल २०२० पासून सर्व डिझेल कार मॉडेलची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वी एर्टीगाचे नवे मॉडेल ग्राहकांसाठी बाजारात आणले आहे. कंपनीचे मुख्य विपणन आणि विक्री अधिकारी आर. एस. कल्सी यांच्यामते नवे मॉडेल ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा कंपनीला विश्वास आहे.



फोटोज साठी क्लिक करा : NextGenErtiga

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0