ईशान्य मुंबईतून भाजपचे मनोज कोटक

03 Apr 2019 16:45:08


 

 

मुंबई : ईशान्य मुंबईमध्ये विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना वगळून आता मनोज कोटक यांना संधी देण्यात येत आहे. सोमय्या यांच्यावर शिवसेनेची नाराजी, हे कारण असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, ईशान्य मुंबईच्या उमेदवारीसाठी मनोज कोटक यांना शिवसेनेचा पाठिंबा असल्याचेदेखील सांगण्यात येत आहे. भाजपने ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना उमेदवारी दिल्याचे बुधवारी जाहीर केले.

 

मनोज कोटक यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना पक्षाने दिल्या होत्या. मुंबई महापालिका निवडणुकांच्या वेळी किरीट सोमय्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केलेली टीका त्यांना भोवल्याचे म्हटले जात आहे. मनोज कोटक दोन दिवसांपासून ईशान्य मुंबईतील भाजप कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मनोज कोटक यांच्या कार्यालयात भाजप नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसोबत ये-जा सुरु झाली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0