तापमानाचा पारा वाढला तरीही मतदारराजात मोठा उत्साह

    दिनांक  29-Apr-2019सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात १८.३९ टक्के मतदान

 

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि अखेरच्या टप्प्याचे मतदान राज्यात पार पडत आहे. मुंबई, ठाण्यासह १७ मतदारसंघांमध्ये मतदान चालू आहे. तापमानाचा पारा वाढला असला तरी मतदारांमध्ये उत्साह दिसून येत असून सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात १८.३९ टक्के मतदान झाले. १७ मतदारसंघांत ३२३ उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये कैद होणार असून सुमारे तीन कोटी ११ लाख मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
 

सकाळी ११ वाजेपर्यंत नंदुरबार मतदारसंघात २४. ५९ टक्के, धुळे मतदारसंघात १८. २६ टक्के, दिंडोरी मतदारसंघात २१. ०६ टक्के, नाशिक मतदारसंघात १७. २२ टक्के, पालघर मतदारसंघात २१. ४६ टक्के, भिवंडी मतदारसंघात १७. २५ टक्के, कल्याण मतदारसंघात १३. ९१ टक्के, ठाणे मतदारसंघात १७. ४३ टक्के, मुंबई उत्तर मतदारसंघात १९. ४६ टक्के, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात १७. ६४ टक्के, मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात १८.३९ टक्के, मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात १६. २१ टक्के, मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात १६. ८० टक्के, मुंबई दक्षिण मतदारसंघात १५. ५१ टक्के, मावळ मतदारसंघात १८. २३ टक्के, शिरुर मतदारसंघात १८. ६५ टक्के व शिर्डी मतदारसंघात २०. ५५ टक्के मतदान झाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat