माटुंगा बिग बाझाराला आग

    दिनांक  29-Apr-2019
मुंबई : माटुंगा येथील बिग बाझार येथे भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचे पाच बंब आणि पाण्याचे तीन टॅंकर घटनास्थळी रवाना झाले आहेत. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

 

माटुंग्यातील तुळशी पाईप येथील बिग बाझारच्या इमारतीला सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. याबाबत माहीती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस, स्थानिक प्रशासनाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


दरम्यान, अग्निशमन दलाने नजीकच्य़ा सोसायटीमध्ये जाऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या परिसरातल्या इमारतीतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat