पहले मतदान, फिर जलपान - पूनम महाजन

29 Apr 2019 11:45:52



मुंबई : उत्तर मध्य मुंबईतून महायुतीच्या उमेदवार आणि विद्यमान खासदार यांनी पूनम महाजन यांनी सकाळी वारली येथे मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी सकाळी ७ वाजता वरळी येथील महापालिका शाळेत कुटुंबियांसोबत मतदान केले. त्यानंतर त्यांनी मुंबईकरांना मतदान करण्यासाठी आवाहन केले. "ही संधी थेट पाच वर्षानंतर येईल. तर पहिले मतदान करा आणि नंतर जलपान करा. मुंबईकरांनो वेळ घालवू नका. वोट करा." असे आवाहन त्यांनी ट्विटरवरून मुंबईकरांना केले आहे.

 
 

भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्ष आणि सध्या उत्तर मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांनी २०१४च्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा १ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला होता. उत्तर मध्य मतदारसंघ हा महात्वाचा मानला जातो. या मतदारसंघात वांद्रेसारखा महत्वाचा परिसर येतो. या परिसरात सिनेजगत तसेच उद्योगजगतातील महत्वाच्या व्यक्ती वास्तव्यास आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0