पनवेलकरांनो मोठ्या संख्येने मतदान करा - प्रशांत ठाकूर

    दिनांक  29-Apr-2019पनवेल : सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. गुजराती शाळेमध्ये ठाकूर बंधूंनी आपल्या कुटुंबीयांसोबत मतदान केले. यावेळी त्यांनी पनवेलकरानांही मतदान करण्याचे आवाहन केले. यासोबतच माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी कोपर (गव्हाण ) मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

 

सकाळी ठाकूर बंधूंनी गुजराती शाळेमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. त्याचबरोबर त्यांच्या मातोश्री शकुंतला रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पत्नी वर्षा ठाकूर, तसेच अर्चना परेश ठाकूर यांनी मतदान केले. मतदान हा आपला हक्क आहे. आपला लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा अधिकार वापरला पाहिजे. त्यामुळे पनवेलमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat