जगभर ज्या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये जबरदस्त क्रेज पाहायला मिळत आहे असा व्हेंजर्स एन्डगेम काल प्रदर्शित झाला. हॉलीवूडमधील एक जगप्रसिद्ध असलेली सिरीज म्हणजे अव्हेंजर्स. भारतात पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करत ५० कोटींपेक्षाही जास्त गल्ला जमवला आहे. याबरोबरच भारतातील पहिल्या दिवशी जास्तीत जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये अव्हेंजर्स एन्डगेमची नोंद झाली आहे.
आतापर्यंत सर्वात जास्त कमाई असलेल्या चित्रपटांमध्ये आमिर खानच्या 'ठग्स ऑफ हिंदुस्थान' चा अव्वल क्रमांक आहे. मात्र प्रेक्षकांमधील मार्व्हल स्टुडिओजच्या या अव्हेंजर्स विषयीचे प्रेम बघता हा चित्रपट आमिर खानचे देखील रेकॉर्ड मोडतो की काय अशी शक्यता निर्माण झाली होती मात्र अजून तरी आमिर खानचे रेकॉर्ड कोणत्या चित्रपटाला मोडता आले नाही. या आधी आमिर खानने बाहुबलीचे रेकॉर्ड तोडले होते आता भविष्यात 'ठग्स ऑफ हिंदुस्थान' ला कोण मागे टाकेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat