एअर इंडियाचा 'सर्व'र गोंधळ ; हजारो प्रवाशांचा खोळंबा

27 Apr 2019 16:15:03


 


नवी दिल्ली : एअर इंडियाचे 'सीता' सर्वर डाउन झाल्यामुळे जगभरातील एअर इंडियाच्या प्रवाशांचा मनस्ताप झाला. शनिवारी पहाटे ३.३० वाजता जगभरातील सर्वर बंद पडले. त्याचा चांगलाच फटका विमान सेवा बंद पडली. दुपारपर्यंत यावर काम चालले होते. त्यानंतर सर्वर पुर्वव्रत झाले असले तरी विमानाच्या उड्डाणास विलंब होण्याची शक्यता आहे, अशी माहिती एअर इंडियाचे चेअरमन अश्वानी लोहानी यांनी दिली.

 

सर्वरच बंद पडल्यामुळे हजारो नागरिकांचा खोळंबा झाला. चेक इनसह इतर प्रक्रियाही पूर्ण होण्यात अडचण येत असल्याने भारतासह परदेशातील एअर इंडियाच्या प्रवाशांचा खोळंबा झाला. प्रवाशांनी यामुळे उड्डाणाला विलंब होत तक्रार केली असून विमानतळावरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अश्वानी लोहानी यांनी सकाळी ८:४५ पर्यंत हे काम सुरू असल्याचे सांगितले होते. तसेच, सर्व्हर पूर्ववत झाला असला तरी, यामुळे दिवसभरातील उड्डाणांना विलंब होऊ शकतो, असेही ते म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0