सीएसएमटीमध्ये लोकलचा किरकोळ अपघात

    दिनांक  26-Apr-2019मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील (सीएसएमटी) लोकलचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. हार्बर मार्गावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आलेली लोकल बफर एण्डवर धडकली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या धडकेने लोकलचे नुकसान होऊन हार्बर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

 

बेलापूरवरून सीएसएमटीकडे येणारी लोकल सीएसएमटी स्थानकात आल्यानंतर निर्धारित ठिकाणी न थांबता सुरक्षेच्या दृष्टीने लावण्यात आलेल्या बफर एण्डवर धडकली. आज सकाळी १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मोटरमनने तातडीने ब्रेक दाबल्याने व लोकलचा वेग कमी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

 

सुरक्षेच्या दृष्टीने प्लॅटफॉर्मच्या सुरुवातीला बफर लावलेले असतात.बेलापूरवरून सीएसएमटीकडे येणारी लोकल याच बफरला धडकली असून हा किरकोळ घटना असून यात कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी सुखरूप असून लोकल फेरीसाठी रवाना झाली असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat