विकल्पाची नाही ही संकल्पाची निवडणूक

    दिनांक  26-Apr-2019'मी शिवाजी महाराजांचा मावळा'

 

मुंबई : काँग्रेसला मोठ्या पराभवाला या निवडणुकीत सामोरे जावे लागणार आहे. काँग्रेसला ५० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असे भाकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. विकल्पाची नाही ही संकल्पाची निवडणूक आहे. जे राजकीय नेते जुन्या विचारांमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना २१ व्या शतकातील युवा वर्गाची नस ओळखू शकत नाही. असेही पंतप्रधान म्हणाले. तसेच, पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली.

 

मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरेंच्या तोफा धडाडल्या. यावेळी मोदींनी विरोधकांना इशारा दिला आहे. पुन्हा पंतप्रधान झाल्यास भ्रष्टाचारी नामदारांना तुरूंगात धाडणार, असा मोदींनी सूचक इशारा दिला आहे. यावेळी मुंबईतल्या बीकेसीमध्ये झालेल्या जाहीर सभेत नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार घणाघाती हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. त्यांनी उद्धव ठाकरे छोटा भाऊ असल्याचा उल्लेख केला. "वाराणसी या संस्कृतीच्या नगरीतून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि समृद्ध असलेल्या मुंबईत आशीर्वाद घेण्यासाठी आलो. संस्कृती आणि सामर्थ्य ही भारताची शक्ती." असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

"विकल्पाची नाही ही संकल्पाची निवडणूक आहे. जे राजकीय नेते जुन्या विचारांमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना २१ व्या शतकातील युवा वर्गाची नस ओळखू शकत नाही. तर दुसरीकडे भाजप २८२ चा आकडा पार करणार की, नाही ही चर्चा आहे. मात्र, आमचे एनडीए ३००, ३२५ की ३५० पार करणार ही चर्चा आहे. महात्मा गांधींनी काँग्रेस विसर्जित करायला सांगितली होती. आता ते काम तुम्ही करा. काँग्रेस ४४ आकडा पार करणार की, ४० जागा मिळवणार ही चर्चा आहे. तीन टप्प्याच्या निवडणुकीनंतर एनडीए सत्तेवर येणार हे स्पष्ट झाले आहे." असे मोदी म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat