वंचित आघाडीची गुन्हेगार उमेदवार देण्यात आघाडी

    दिनांक  26-Apr-2019


महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्सचे विश्लेषण


मुंबई : महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) यांनी महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या शपथपत्रांचे विश्लेषण केले आहे. यात तब्बल २८ टक्के म्हणजे ८९ उमेदवाराविरोधात गुन्हे दाखल आहेत. यात वंचित आघाडीच्या सात, बहुजन समाज पक्षाच्या पाच, भारतीय जनता पक्षाच्या चार, शिवसेनेच्या सात, काँग्रेसच्या चार, भाजपच्या चार आणि राष्ट्रवादीच्या पाच उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत.

 

नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई-उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई-दक्षिण, मावळ, शिरूर आणि शिर्डी या १७ मतदारसंघातील ३२३ उमेदवारांपैकी ३२० उमेदवारांचा यात समावेश आहे. यापैकी ८९ उमेदवाराविरोधात गुन्हे दाखल असून यापैकी ६४ उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर तिसऱ्या टप्प्यातील १७ पैकी १५ मतदारसंघ अति संवेदनशील मतदारसंघ आहेत.

 

तिसऱ्या टप्प्यातील विश्लेषित केलेल्या ३२० उमेदवारांपैकी १०९ उमेदवार हे कोट्यधीश असून त्यांची सरासरी मालमत्ता ४ कोटी ४७ लाखापेक्षा जास्त आहे. पक्षनिहाय वर्गवारी केली असता यात भाजपचे सात, वंचित बहुजन आघाडीचे सहा, काँग्रेसचे नऊ, शिवसेनेचे दहा, राष्ट्रवादीचे सात आणि बसपाचे सहा उमेदवार कोट्याधीश आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat