सोशल मिडियावर फिरणारा 'तो' मेसेज चुकीचाच

    दिनांक  25-Apr-2019
मुंबई : लोकसभा निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानानंतर दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याचे मेसेजेस सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मात्र या मेसेजमध्ये काहीही तथ्य नसल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. अशाप्रकारच्या चुकीच्या मेसेजवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन यावेळी आयोगाने केले आहे.

 

लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या आदल्या दिवसापासून ते मतदानानंतरही रात्री उशिरापर्यंत या कर्मचाऱ्यांना सलग काम करावे लागते. यामुळे या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि अन्य कर्मचाऱ्यांना दुसऱ्या दिवशी सुट्टी मिळावी, अशी मागणी अनेक संघटनांनी केली होती. यावरूनच राज्यात हा चुकीचा मेसेज सोशल मिडीयावर फिरत होता. यावर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने स्पष्टीकरण दिले आहे.

 

मतदानानंतर दुसऱ्या दिवशी सुट्टी जाहीर झाल्याचे चुकीचे वृत्त समाजमाध्यमांवर विशेषत: व्हॉट्सॲपवर पसरविण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. या माहितीमध्ये कोणतेही तथ्य नसून सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही, असे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने स्पष्टीकरण देताना सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat