इंफिनिक्सचा 'स्मार्ट 3 प्लस' फोन लॉन्च

    दिनांक  25-Apr-2019


मुंबई : ट्रांशन होल्डिंग्सचा प्रीमियम स्मार्टफोन ब्रॅंड इंफिनिक्सने स्मार्ट 3 प्लसहा नवीन फोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. स्मार्ट 3 प्लस हा ७ के श्रेणीतील असा पहिला स्मार्टफोन आहे, ज्यात लो-लाइट सेन्सर असलेला ट्रिपल कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन आधुनिक अँड्रॉइड पाय ९.० ऑपरेटिंग प्रणालीद्वारा संचालित आहे. ३० एप्रिल पासून हा फोन फक्त फ्लिपकार्टवर मिडनाइट ब्लॅक आणि सफायर स्यान या रंगांमध्ये उपलब्ध असेल. जिओ यूझर्सना प्रत्येक स्मार्ट 3 प्लस च्या खरेदीवर ४५००/- रु ला लाभ मिळेल.

 

स्मार्ट 3 प्लसमध्ये १३ एमपी +२ एमपी ट्रिपल रियर कॅमे-यात ड्युअल एलईडी फ्लॅश आणि डेप्थ फोकस आहे. शिवाय या फोनमध्ये ८ एमपी फ्रंट सेल्फी कॅमेरा आहे, ज्यात उत्कृष्ट सेल्फीसाठी एआय संचालित ब्युटी मोड आहे. यातील अत्याधुनिक एआय फ्रेमवर्क फोन कॅमे-याची क्षमता वाढवते, ज्यामुळे प्रतिमेस समायोजित करण्यासाठी ८ वेगवेगळ्या मोडमधून ऑटो सीन डिटेक्शन होऊ शकते. रियर कॅमे-या कस्टमाइझ्ड बोकेह मोड देखील आहे, ज्यामुळे यूझर्स बॅकग्राऊंड ब्लर इफेक्ट नियंत्रित करू शकतात.

 

स्मार्ट ३ प्लस मध्ये ६.२१एचडी + ड्रॉप नॉच डिस्प्ले आणि ८८ टक्के स्क्रीन टू बॉडी गुणोत्तर असेल, जे स्मार्टफोन डिस्प्लेचे एज टू एज अॅक्सेस देते. डिस्प्ले ५०० निट्सची चमक देते, जे एक अत्यंत चांगले ल्युमिनन्स रेटिंग समजले जाते. यात एआय स्मार्ट पावर सेव्हिंग सह ३५०० एमएएच बॅटरी आहे, जी डिव्हाईसला संपूर्ण दिवसाचे पॉवर बॅकअप देते. यात मोठी बॅटरी असूनही, हा स्मार्टफोन फक्त ७.८ मिमी जाडीचा आहे आणि त्याचे वजन १४८ ग्राम आहे. अधिक सुरक्षेसाठी यात सुपरफास्ट फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक सुविधा आहेत.

 

हा फोन एक्सओएस ५.० चीता लेअर सह एक स्मूद आणि जलद सॉफ्टवेअर अनुभव देतो, जो नवीन अँड्रॉइड पाय ९.० ओएसची कार्यक्षमता वाढवतो आणि एक अनुकूलित यूझर इंटरफेस प्रदान करतो. गेमिंग प्रेमींसाठी या फोनमध्ये गेम बूस्ट फीचर आहे जे संपूर्ण सीपीयू संसाधनांना एका विशिष्ट गेमच्या निर्विघ्न अनुभवासाठी समर्पित करण्याची अनुमती देतो. इंफिनिक्स सोबत यूझर मल्टी-विंडो कार्यक्षमतेचा उपयोग करून एका वेळी २ अॅप चालवत सहजगत्या मल्टी-टास्किंग करू शकतात.

 

इंफिनिक्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिश कपूर म्हणाले, “या श्रेणीत पहिल्यांदाचा ही वैशिष्ट्ये प्रदान करत आणि उपयोगिता व सुविधा यांच्यावर फोकस ठेवून तयार करण्यात आलेला स्मार्ट 3 प्लस हा खरोखर ग्राहकांसाठी या वर्गातील एक आदर्श फोन आहे. ट्रिपल कॅमेरा आणि एआयद्वारा सक्षम एक व्यापक अनुभव यासारखी ऑफरिंग सादर करून स्मार्ट ३ प्लस पहिल्यांदाच स्मार्टफोन यूझर्ससाठी हाय एंड स्मार्टफोनचा अनुभव देण्यास सक्षम असेल. स्मार्ट ३ प्लस हा निश्चितपणे आमच्या उत्पादनांच्या पोर्टफोलियोमध्ये एक नवीन परिमाण जोडत आहे. व त्याचबरोबर, व्यापकदृष्ट्या बजेट स्मार्टफोनच्या विभागात एक आकांक्षा मूल्य देखील जोडत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat