राजकीय प्रचार केल्याने नरसिंग यादव निलंबित

    दिनांक  24-Apr-2019मुंबई : कुस्तीपटू आणि मुंबईचे सहायक पोलीस आयुक्त नरसिंग यादव यांचे निलंबन करण्यात आले आहे. काँग्रेसचे उत्तर पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार संजय निरुपम यांचा प्रचार केल्यामुळे निवडणूक आयोगाने ही कारवाई केली. यादव हे निरुपम यांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते. याबाबतची तक्रार मुंबईच्या आंबोली पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली होती.

 

नरसिंग यादव हे मुंबई पोलिसांच्या शस्त्रागार विभागात कार्यरत आहेत. त्यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतरच त्यांना निलंबित करण्यात आल्याचे अतिरीक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, सरकारी सेवा बजावत असताना कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना निवडणूक व राजकीय प्रचारात सहभाग घेता येत नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat